बस थांबविण्याच्या कारणावरून बस चालकास शिवीगाळ व मारहाण, वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास सुद्धा संशयितानी केली धक्काबुक्की

Spread the love

जामनेर ( प्रतिनिधी) :- बस थांबा नसतानाही बस थांबाविण्याच्या आग्रहावरून बसच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्याने बस चालकाने बस पोलीस ठाण्याच्या आवारात आणली. तेथेच संशयित आरोपीकडून बस चालकास मारहाण केल्याची घटना घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी मुक्ताईनगर डेपोची बस चालक विजय शिवाजी पाटील तसेच वाहक ईश्वर नानोटे हे बोदवड येत असताना बोदवड येथुन बसलेल्या बुरहान शेख वजीर याने तुम्ही ओळखत नाही का असा दम देत याने बस थांबविण्याची मागणी केली परंतु बस थांबा नाही म्हणून वाहकाने बस थांबविली नसल्याने त्यास अश्लील शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. वाहकाने बस जामनेर पोलीस ठाण्यात आणली असता आरोपी बुरहान शेख वजीर याने फोन द्वारे गैर कायद्याची मंडळी जमवुन वाहक व चालक यांस जबर मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.मारहाणीचा प्रकार पोलीस ठाण्याच्या परिसरातच झाल्याने शांत असलेल्या जामनेर शहराची वाटचाल ही गुन्हेगारी कडे वळत असल्याची भावना ही सामान्य नागरीकांनी व्यक्त केली.दरम्यान वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास सुद्धा संशयित जमावाने धक्काबुक्की करून मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला.राजकीय दबावातुन आरोपींना वाचविण्यासाठी तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी काही पुढारी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेली होती.मुक्ताईनगर म.प.मंडळ बस चालक विजय शिवाजी पाटील रा.खेडी यांच्या फिर्यादीवरून शेख बुरहान शेख वजिर तसेच अन्य तीन जणांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला बी. एन.एस.कलम १३२, ११५ (२) ३५२, ३५१ (२)३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.इम्रान अली सय्यद अली हे करीत आहे..

मुख्य संपादक संजय चौधरी