कांताई धरणाच्या पाण्यातून यंत्राच्या साह्याने भरमसाठ अवैध वाळू उपसा ; ऊपाय योजना करा मागणी.

Spread the love

तहसीलदारांची ग्रामपंचायत व ग्राम दक्षता समितीला सक्त ताकीद ; पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींना धोका

एरंडोल :- तालुक्यातील गिरणा नदीपात्रातील वाळू संपल्याने आता वाळू माफियांनी कांताई धरणाच्या पाण्यात असलेल्या वाळुकडे मोर्चा वळवल्याने धरणाच्या पाण्यातून वाळू यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाळु उपसा केला जात असल्याचे चित्र आहे. नदीकिनारी काठावर पाळधी,मोठे पिंपळकोठा, बांभोरी, सावदा, रिंगणगाव, पिंपळकोठा प्रचा व खेडी कढोली या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहे तर
काही पाणी पुरवठा योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याने भविष्यात काही दिवसांनी या गावांचा पाणीपुरवठा थोक्यात येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे मात्र महसूल विभागालाही वाळू माफिया जुमानात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्राम दक्ता समितीत बदल करण्याची आवश्यकता : —-

नदी किनारी असलेल्या गावांमध्ये अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी असलेली ग्राम दक्षता समितीत स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर अवैध वाळु वाहतुकीत काही ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचेही हात असल्याचे बोलले जात आहे तसेच अवैध वाळू वाहतुकीसाठी त्यांचेही वाहनांचा समावेश असल्याने या समितीत बदल करून गावातील सुज्ञ नागरिकांना पोलीस संरक्षण वप्रशासनालाही त्यात सहभागी करून घेण्याची मागणी खेडी खुर्द ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे

वाळु काढणारे यंत्र मशीन चे स्वरुप :—-

ही पाण्यातून वाळू काढणारी मशीन म्हणजे ट्रॅक्टर वर चालणारी असून या मशीनला या काठा पासुन ते त्या काठा पर्यंत रोपवे टाकून त्याला एक सुपडे बांधले जाते व ते सुपडे नदीच्या पाण्यात टाकून दिवसा व रात्री शेकडो ब्रास वाळु काढली जाते . त्यामुळे शासनाचा महसूल तर बुडतच आहे त्याचबरोबर नदीचे अस्तित्व धोक्यात येण्यासह पाणीपुरवठा करणाऱ्या परिसरातील गावांना भविष्यात पाणी मिळणे कठीण होणार असल्याचे बोलले जात आहे

कोट :—

प्रदीप पाटील तहसीलदार एरंडोल :—

कांताई धरणाच्या बाजूला नदीकिनारी परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत त्यामुळे याची दखल घेऊन लवकरच गावागावात ग्रामपंचायत व ग्राम दक्षता समितीची बैठक घेऊन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य तलाठी यांच्यावर जबाबदारी टाकण्यात येणार असून त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई
चा कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवण्यात येईल करण्यात येईल.

मुख्य संपादक संजय चौधरी