
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यातच काल राज ठाकरे हनुमान जयंतीला पुण्यात आले होते. यावेळी पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती आणि सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले आहे.
दरम्यान, आज राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी ५ जून रोजी मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असून श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
पुढे राज ठाकरे म्हणाले की.., ‘भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. भोंग्याच्या आवाजाचा त्रास हा हिंदूनाच होत नाही, तर मुस्लिमांनादेखील होत असल्याचे एक उदाहरण देऊन सांगितले.