एरंडोल :- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना,युवासेना,महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.४) सायंकाळी सहा वाजता रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर प्रसिद्ध लेखक वसंत हंकारे यांचे ‘आई-बाप समजून घेतांना’ या विषयावर व्याख्यान आयोजित
करण्यात आले आहे.व्याख्यानास तालुक्यातील नागरिक,महिला तसेच युवक,युवतींनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख बबलू चौधरी यांचेसह पदाधिका-यांनी केले आहे.दरम्यान आमदारपदी निवड झाल्यानंतर आमदार अमोल पाटील यांचा पहिलाच
वाढदिवस असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.