एरंडोल येथे माता रमाई जयंती उत्साहात संपन्न; रमाई उद्योजक महिला संघाची स्थापना

Spread the love

एरंडोल :- येथील श्रावस्ती पार्क येथे माता रमाई जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिराबाई सपकाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रशिक्षण विभागाचे मार्गदर्शक विवेक सैंदाणे कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमिला तामस्वरे यांनी रमाईचे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘त्यागमूर्ती माता रमाई’ पुस्तकाच्या लेखिका वर्षा शिरसाठ यांनी केले. नेहा खैरनार व निशू तामस्वरे यांनी रमाईच्या जीवनावर आधारित गीत सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख मान्यवर विवेक सैंदाणे यांनी रमाई उद्योजक संघाची कार्यकारिणी जाहीर केली. वर्षा शिरसाट यांची एकमताने रमाई महिला उद्योजक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रमाई उद्योजक संघ एरंडोल कार्यकारिणी खालील प्रमाणे…

अध्यक्ष- वर्षा भरत शिरसाठ
कार्याध्यक्ष- सुलोचना खोब्रागडे
उपाध्यक्ष- मनीषा चिंतामण जाधव
सचिव- जयश्री सुभाष अमृतसागर
उपसचिव- प्रमिला नामदेव तामस्वरे
सहसचिव- मनीषा गौतम केदार
कोषाध्यक्ष- सुवर्णा शंकर शिरसाठ
-सदस्य-
रमाबाई मुकेश ब्राह्मणे
ज्योती रवींद्र गजरे
प्रिया रवींद्र भगत
कविता विश्वनाथ ब्राह्मणे
मीना भगवान ब्रह्मे
ज्योती शशिकांत रामोशी
शितल सिद्धार्थ साळुंखे
सुमनबाई बिऱ्हाडे
खटुबाई शिरसाट
आम्रपाली समीर शिरसाठ
संगीता सुनील खैरनार
सारिका सुनील खैरनार
अलका निंबा खैरनार
सुरेखा गौतम सोनवणे

इत्यादींची निवड करण्यात आली.
रमाई उद्योजक समूहाची सदस्य नोंदणी सुरू राहणार असल्याचे अध्यक्षा वर्षा शिरसाठ यांनी सांगितले.
सदर प्रसंगी समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी रमाई महिला उद्योजक समूहाला शुभेच्छा दिल्या. एरंडोल तालुक्यामध्ये रमाई महिला उद्योजक समूहाचे चांगले उद्योग सुरू झाले पाहिजे व त्यातून अनेकांना रोजगार मिळाले पाहिजेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या. सदर प्रसंगी चिंतामण जाधव सर, गौतम केदार, शंकर शिरसाठ, मुकेश ब्राह्मणे, गौतम सोनवणे, बाबुराव भगत, रघुनाथ सपकाळे, डाॅ. शुभम जाधव, अभिषेक खैरनार, सत्यम रामोशी तसेच अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी