एरंडोल :- तालुक्यातील रवंजे बु. येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एकास गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी अटक केली असून त्याच्याकडील गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आला असल्याची नोंद एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस हे.कॉ.नंदलाल पाटील,संदीप पाटील, भगवान पाटील परविन मांडोळे तथा पो.कॉ.राहुल कोळी व दोन पंचा समक्ष रवंजे बु.येथील गावाबाहेरील गौरीशंकर माध्यमिक विद्यालयाच्या समोर दि.११/२/२०२५ रोजी रात्री १०.३० वा. दरम्यान आरोपी प्रवीण अशोक कोळी वय २२ याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेस डाव्या बाजूस स्वेटरच्या खाली जीन्स पॅन्ट मध्ये गावठी कट्टा खोचलेला मिळून आला यात जिवंत काडतूस देखील आढळून आले. दरम्यान सदर गावठी कट्टा व जिवंत काडतुसे यांची अंदाजे किंमत पंचवीस हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे फिर्याद पो.कॉ. राहुल कोळी यांनी दिली असून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करून एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.
पुढील तपास एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत,पोलिस उपनिरीक्षक रोहिदास गबाले,शंकर पवार पो.हा.अनिल पाटील यांच्या तपास करीत आहे.