एरंडोल :- शहरातील आठवडे बाजार परिसरातील महादेव मंदिरासमोर अनेकदिवसांपासून सुरु असलेला अवैध कत्तलखाना त्वरित बंद करण्यात यावा,तसेचकत्तलखाना चालवणा-यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविधहिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी प्रांताधिकारी,तहसीलदार, पालिकेचे प्रशासक,पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अवैधरीत्या सुरु असलेला कत्तलखाना बंद करण्यात यावा यासाठीहिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व महिलांनी पंचायत समितीपासून पदयात्राकाढून प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील,पालिकेचेप्रशासक अमोल बागुल,पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना निवेदन दिले. हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आठवडे बाजार परिसरातील अंजनी नदी पात्रालगत अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे कत्तलखाना सुरु असून याठिकाणी गोवंशाची हत्या केली जात आहे.यापूर्वी देखील कत्तलखान्याबाबत रहिवाशांनी अनेकवेळा तक्रारी देवून देखील पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
कत्तलखान्यासमोरच महादेव मंदिरअसून याठिकाणी दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. तसेच कत्तलखाना अंजनी नदी पात्रालगत असल्यामुळे पात्राचे पाणी दुषित होऊन नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे.कत्तलखानापरिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे मंदिरात येणा-याभाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत पालिका प्रशासनासहसंबंधित विभागाने तातडीने दाखल घेवून सदर कारखाना त्वरित बंद करून जमीनदोस्त करण्यात यावा अशी मागणी संघटनांच्या पदाधिका-यांनी केली आहे.
यावेळी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्षराजेंद्र चौधरी,गोरक्षक भरत महाजन,माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर,अशोकचौधरी,गोरख चौधरी,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,शोभनासाळी,निशा विंचूरकर,वंदना कुलकर्णी,रश्मी दंडवते,विनोद ठाकूर,advt.दिनकरपाटील,काशिनाथ महाजन,प्रकाश शिरोडे यांचेसह पदाधिकारी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.उपस्थितांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.फोटो ओळी-एरंडोल येथे पालिकेचे प्रशासक अमोल बागुल यांना निवेदन देतांनामहिला मंडळ व हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी.