जळगाव येथील निवृत्त मुख्याध्यापकाच्या घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्या प्रकरणी स्था. गु. शाखेने एकास मुद्देमालासह केली अटक

Spread the love

जळगाव :- कुटुंबासह भावाकडे गेलेल्या निवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घराचा फायदा घेत चोरट्याने घरातून सव्वा लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

त्याला १२ तास उलटत नाही तोच स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडीचा उलगडा केले. एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. सचिन भागवत सपकाळ (रा. मोहाडी ता. जामनेर) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

गुजराल पेट्रोल पंपाशेजारील निवृत्ती नगरातील संकल्पसिद्धी अपार्टमेंट येथील निवृत्त मुख्याध्यापक अनिल लक्ष्मण सपकाळे हे मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता त्यांची तालुक्यातील धामणगाव येथे राहत असलेली आई भावाकडे आली म्हणून पत्नी, सून व नातू यांच्यासह गेले होते. आईला भेटून अर्ध्या तासात ३.४५ वाजता फ्लॅटवर परत आले तेव्हा फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी अर्ध्या तासात १ लाख ३५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या घरफोडीची माहिती एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सचिन सपकाळ याने साथीदारांच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे समजले.

गुन्ह्यातील दुचाकी जप्त

संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची प्लॅटिना दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईएल ३७६१), पन्नास हजार रोख व एक ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण १,३२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सचिन भागवत सपकाळ याला पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मुख्य संपादक संजय चौधरी