ब्रेकिंग न्यूज ; भाजपच्या पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक

Spread the love

, देवेंद्र फडणवीस म्हणतात, “हे होणं अपेक्षितच, कारण…”

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोध पक्ष भाजपामध्ये  शाब्दिक आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु झाल्याचे दिसत आहे.  दरम्यान, भाजपाकडून बीएमसीवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला तसेच त्याविरोधात पोलखोल यात्रेची सुरुवात केली. यानंतर पोलखोल यात्रेच्या रथावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. याच विषयावर  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले आहे.

दगडफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी, “आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणं अपेक्षितच आहे. ज्याप्रकारे यांचा बुर्खा फाटतो आहे, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यातूनच ते असा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी काहीही केलं तरी यात्रा थांबणार नाही. आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करू.” असे म्हटले आहे.

भाजपाकडून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. तसेच हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भाजपाने पोलखोल यात्रा सुरू केली आहे.  मात्र, त्याआधीच या पोलखोल यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या रथाची काही अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. भाजपाने ही तोडफोड महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ही तोडफोड करणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केलीय. तसेच आरोपींना तातडीने अटक न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

टीम झुंजार