मुंबई /जळगांव प्रतिनिधी दि. 11 – विधानभवन येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. अन्यायाविरोधातील त्यांचे संघर्षशील जीवन आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आजही आपल्याला राष्ट्रहितासाठी एकजूट होण्याची प्रेरणा देते. संभाजी महाराजांनी कधीही अन्यायासमोर शरणागती पत्करली नाही. त्यांचा अभिमानास्पद इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहूया