एरंडोल :- शिक्षकाकडून शाळेतील स्टाफ रूममध्ये शाळेत शिकणा-या पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील एका गावात घडल्यामुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान संशयित शिक्षक फरार असून पोलिसांचे दोन पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी,की एरंडोल तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारी पंधरा वर्षीय विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली तर तिचे आईवडील शेतात कामासाठी गेले होते.सकाळी दहा वाजेच्या सुमारास विज्ञान विषयाचे शिक्षक संशयित मंगेश हरी पाटील यांनी सदर विद्यार्थिनीस स्टाफरुममध्ये बोलावले.रूममध्ये शिक्षक मंगेश एकटेच होते.शिक्षक मंगेश पाटील यांनी विद्यार्थिनीस तु व तुझ्या मैत्रिणी
शुक्रवारी शाळेत का आल्या नव्हत्या असे विचारले असता विद्यार्थिनीने आम्ही शाळेत आलो होतो असे सांगितले.शिक्षक मंगेश पाटील यांनी विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे केले.विद्यार्थिनीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून स्वत:ची सुटका करून घेतली आणि वर्गात जाऊन बसली.शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती विद्यार्थिनीने महिला शिक्षकांना सांगितले असता त्यांनी सदर घटनेची माहिती
मुख्याध्यापकांना दिली.शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी आली आणि रडत होती.दुपारी तीन वाजेच्या आईवडील घरी आले असता त्यांना मुलगी रडत असल्याची दिसून आले.त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने शाळेत घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली.याबाबत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड तपास करीत आहेत.संशयित शिक्षक फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना करण्यात आले आहे.अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी यांनी घटनास्थळी भेट दिली.