देवरिया :- लग्न हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो जो दोन लोकांना एका अटूट बंधनात बांधतो. हा दिवस आनंद, उत्सव आणि कुटुंब आणि मित्रांच्या शुभेच्छांसह भरलेला असतो. पण एका गावात लग्नादरम्यान एक भयानक प्रसंग घडला.इथे जेव्हा डीजे वाजवण्यावरून वाद झाला आणि त्यात एकाचा मृत्यू झाला. ज्यामुळे लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलला.
हाता कोतवाली भागातील पाईकौली लाला गावात लाल मोहन पासवान यांच्या मुलीचे लग्न देवरिया जिल्ह्यातील जोगिया रुद्रपूर येथील राहुलसोबत ठरले होते. संध्याकाळी ७ वाजता वरात धुमधडाक्यात आली. सुरुवातीला वातावरण आनंदाचे होते. वधू पक्षाने वराचे आणि त्याच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
द्वारपूजा, जयमाला आणि मेजवानी या पारंपारिक विधींनी लग्नाची सुरुवात झाली. पण रात्री उशिरा 10 वाजता डीजेवर वाजणार्या गाण्यांवरून वधू-वर पक्षामध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका चिघळला की त्यात हाणामारी सुरू झाली. या धक्कादायक घटनेत वधूचा भाऊ अजय पासवान याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ सत्यम गंभीर जखमी झाला. सत्यमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो मृत्यूशी झुंज देत आहे.लग्नात आलेला वराचा एक नातेवाईकही या मारामारीत जखमी झाला. या मुळे आनंदाचा हा प्रसंग दुःखाच्या सागरात बुडाला. हे लग्न आता मोडलं गेलं आहे आणि जखमींना तातडीने सुकरौली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथून त्यांना गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले.
पोलिसांनी अजयच्या मृतदेहाचा ताबा घेतला असून घटनास्थळी फॉरेन्सिक तपास सुरू आहे. मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर वधू संजना घटनास्थळावरून पळून गेली आणि वराचे कुटुंबीयही तेथून निघून गेले आहे.