गाईला वाचविण्यासाठी कुटुंबाने ओढली बैलगाडी! प्रेम पाहून, त्या मुक्या जिवाच्या डोळ्यात अश्रू तरळले

Spread the love

गाईला वाचविण्यासाठी कुटुंबाने ओढली बैलगाडी! प्रेम पाहून, मुके मातृत्वही गहिवरले

ठाणे : गोमातेचे रक्षण करा, असे नुसते संदेश देऊन चालत नाही तर त्यासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकणारी माणसं या जगात आहेत याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील विहिगावात आला. जखमी झालेल्या गर्भवती गाईला बैलगाडीत घालून भरउन्हात ती गाडी स्वत: ओढत नेऊन तिच्यावर उपचार करण्यासाठी अख्खे कुटुंब धावले. हे पाहून त्या मुक्या जिवाच्या डोळ्यात अश्रू तरळले.

आयुष्यभर आधार देणारी ‘ढवळी’ अपघातात जाय झाली. तिला वाचवण्यासाठी घरातील मुला-बाळांनी तिला बैलगाडीमध्ये टाकले. बैलांच्या जागी स्वत:ला जुंपले. भर उन्हात बैलगाडी ओढत तिला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. मूलभूत साधनांअभावी ग्रामीण भागात जगणे आजही कष्टप्रद आहे मात्र तिथे भूतदया आजही जिवंत आहे, हे यातून दिसले.

टीम झुंजार