धक्कादायक! माझ्या भाऊ तुझ्यामुळे बिघडला तो कामावर जात नाही; भावासोबत अफेअरच्या संशयातून तरुणीला 3 महिलांकडून बेदम मारहाण.

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :- शहरातील सुदर्शननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं तीन महिलांना एका तरुणीला बेदम मारहाण केली आहे. पीडित तरुणी एका उद्यानात बसली असताना तीन महिलांनी अचानक तिच्यावर हल्ला केला. आरोपी महिलांनी पीडितेला जमीनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शननगरच्या हडको येथील उद्यानात भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरुणीला उद्यानातच बेदम मारहाण केली. आसपास लहान मुले खेळत असताना अश्लील शिवीगाळ, आरडाओरड करून हा धिंगाणा सुरू होता. एन-11 मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली.अंदाजे २५ वर्षांची तरुणी सोमवारी एन-11 च्या सुदर्शननगरमधील एका उद्यानात बसली होती.

यावेळी तीन महिलांनी तिचा पाठलाग करत तिला उद्यानात गाठले. अचानक तिच्यावर हल्ला चढवून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तरुणी मारहाण न करण्यासाठी विनवणी करत होती. मात्र तीनही संतप्त महिलांनी तिला जमिनीवर पाडून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संशयातून मारहाण

तुझ्यामुळे माझा भाऊ कामावर जात नाही. तुझ्या नादाने तो बिघडला. तुझ्यासाठी तो आम्हाला त्रास देतो, अशी तक्रार करत या महिला पिडीतेला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.आरोपी महिलांनी पीडितेला जमीनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी