धरणगाव येथे प्रथम तीर्थंकर ‘भगवान ऋषभदेव” जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

Spread the love

धरणगाव | प्रतिनिधी :- धरणगाव : येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात प्रथम तीर्थंकर १००८ भगवान ऋषभदेव जन्मकल्याणक महोत्सव प.पू.१०८ अक्षयसागर महाराजांच्या प्रेरणेने सानंद संपन्न झाला. सकाळी मंदिरात भगवान ऋषभदेव यांचा अभिषेक मोठ्या उत्साहात करण्यात आला. त्यावेळी अनेक भाविकांनी उपस्थिती दिली. त्यानंतर शिखरावर नवीन ध्वजारोहण अध्यक्ष राहुल जैन, तनय डहाळे, मनीष लाड, नितीन जैन व विनोद जैन यांच्या हस्ते करण्यात आले. सायं. राजुलमती महिला मंडळद्वारे मंदिरात भक्ताम्बर दीप विधान व भगवान ऋषभदेव यांची आरती मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या सर्व कार्यक्रमासाठी सावन जैन, सारंग जैन, संजीव जैन, अर्णव जैन, विलास जैन, रुपेश जैन उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, राजुलमती महिला मंडळ व धरणगाव जैन उत्सव मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.

मुख्य संपादक संजय चौधरी