धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव : पारंपारिक कुस्ती खेळ आणि शारीरिक शिक्षण विकासाच्या क्षेत्रात राज्यस्तरावर नावलौकिक असलेल्या धरणगाव येथील चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाची बैठक आज रोजी जय हिंद व्यायाम शाळेत घेतली. बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते झाली. तत्पूर्वी श्री.हनुमंतरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर शहरातील नामवंत पहिलवान दिलीप मांगो महाजन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड झाली आहे. त्यानुसार, उपाध्यक्षपदी चंद्रकांत सोनार, अनिल महाजन, खजिनदार प्रविण कंखरे, सह खजिनदार राजेंद्र वाघ, सचिव गुलाब महाजन, सहसचिव किशोर पवार यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी प्रकाश मराठे, नंदू करोसिया, शाहरुख खाटीक, गोरख माळी, भावेश पाटील, जगदीश मराठे, ईश्वर चौधरी, किशोर महाजन, भागवत मराठे, चंदन पाटील, हरी महाजन, गोपाळ पाटील, विनोद माळी, ललित मराठे, रघुनाथ माळी, अनिल महाजन, कोमल शुक्ल, रमेश महाजन आदी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.