चाळीसगाव :- शिवसेनेचे मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी चाळीसगाव शहर पोलीस यांची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना निवेदन देण्यात आले
माननीय मा.ना एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले, महाराष्ट्रात कॉमन मॅन म्हणून आपली एक वेगळी व निर्माण केली अशा लोकनेत्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने आमच्यासारख्या तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखविल्या गेल्यात भविष्यात अशी फालतुगिरी आम्ही खपवून घेणार नाही व झाल्यास यांचे तीव्र पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही तरी याबाबत दखल घेऊन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरान वर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना तर्फे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील, युवासेना शहरप्रमुख सोमा चौधरी, शहरप्रमुख शुभम राठोड, शेखर गवळी, प्रतिभाताई पवार, मनीषा ताई महाजन, सुवर्णताई राजपूत, आकाश जाधव, संजीव पाटील, दिलीप पाटील, दीपक कुमावत, शेखर गवळी, विशाल धनगर प्रदीप मगर, विशाल पवार, पवन सैंदाणे, त्रिशूल गोसावी, योगेश चौधरी, दिनेश कासार, इकबाल पठाण, शकील मुल्ला, जय राजपूत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते