अकोला:- व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील तेव्हारा येथील तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.थार येथील एमआयडीसी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.शिलानंद तेलगोटे हे तेल्हारा तहसील अंतर्गत हिवरखेड येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. असं असताना त्यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दरम्यान तलाठ्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पत्नीवर गंभीर आरोप केले असल्याचे समोर आले आहे. पत्नी शिवीगाळ करत असल्याचा आरोप तलाठीने केला आहे. तर, मेव्हण्याला दिलेले पैसे तो परत देत नसल्याने आपल्या पगरातून पैश्याची कपात होत असल्याचेही त्यांनी स्टेटसमध्ये लिहिलंय.
मृत्यूनंतर माझा चेहरा पत्नीला दाखवू नये…..
या घटनेनंतर तलाठी यांनी आपल्या मोबाईलवर ठेवलेल्या स्टेट्सची चर्चा होऊ लागली आहे. पत्नीच्या त्रासापायी जीवन संपवित असल्याचा उल्लेख असून मृत्यूनंतर माझा चेहरा पत्नीला दाखवू नये, असा या स्टेट्स मध्ये उल्लेख आहे. याचीच चर्चा होऊ लागली आहे. मात्र, पुढील चौकशी व तपासातून या घटनेमागील नेमके कारण समोर येईल.
‘व्हॉट्सअप’वर स्टेटस काय?…..
मी श्री. शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा) मी दिनांक ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते, आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं PM होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल… कारण माझी पत्नी…