एरंडोल बंदला शंभर टक्के प्रतिसाद.जनआक्रोश मोर्चातील विविध घोषणांनी परिसर दुमदुमला, हजारो नागरिकांसह महिलांच्या सहभाग.

Spread the love

एरंडोल :- पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या पर्यटकांच्या हत्येच्यानिषेधार्थ सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या शहर बंदला शंभर टक्के प्रतिसादमिळाला.शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच बंद असल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला होता.अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ पांडववाड्यापासून भव्य निषेध जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला.मोर्चातसहभागी झालेल्या युवकांनी पाकिस्तानच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसरदणाणून सोडला.मोर्चात माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन व माजी उपनगराध्यक्षजगदीश ठाकूर यांनी अतिरेक्याच्या वेशभूषेत असलेल्या व्यक्तीला दोरखंडानेबांधून सादर केलेला जिवंत देखावा मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले.

पहेलगाम येथे अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्यावतीने शहर बंदचे आवाहन केले होते.शहरातीलसर्व व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून बंदला शंभर टक्के प्रतिसाददिला.बंदमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता.सकाळीदहा वाजता पांडवाड्यापासून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चातील महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.मोर्चात सहभागी झालेले युवक पाकिस्तानच्या विरोधात विविध घोषणा देतहोते.प्रांताधिकारी कार्यालयात माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,दशरथ महाजन,जगदीश ठाकूर, जगदीश पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन यांनी मनोगत व्यक्त करून अतिरेक्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली.

मोर्चाच्या अग्रभागी अतिरेक्यांच्या वेशभूषेत असलेल्या एका व्यक्तीस दोरखंडाने बांधण्यात आले होते व दोराचे एक टोक माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी तर दुसरे टोक माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी धरलेहोते.छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलातील प्रमुख रस्त्यावर चिकटवण्यात आलेल्या पाकिस्तानच्या ध्वजावर प्रत्येक व्यक्ती चप्पल मारून निषेध नोंदवत होता.मोर्चात माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,आर.डी.पाटील,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,सुरेश दाभाडे,अमोल जाधव,डॉ.प्रशांत पाटील,माजी नगरसेवक योगेश महाजन,डॉ.नरेंद्र पाटील,अतुल महाजन,भाजपचे जिल्हासरचिटणीस निलेश परदेशी,प्रसाद दंडवते,राजेंद्र महाजन,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,शोभा साळी,रश्मी दंडवते यांचेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे तसेच राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

मुख्य संपादक संजय चौधरी