एरंडोल | प्रतिनिधी :- कोमात असलेल्या जळगावच्या तरुणाचा महामार्गावरील आयुध निर्माण फाट्याजवळ साई बाबा मंदिरा जवळ ( भुसावळ) अपघातात मृत्यु झाल्याचे दर्शविले चा आरोप संशयितांवर होता. कटात सहभागी असल्याचा व अपघाताची खोटी फिर्याद दिल्याचा आरोप घनशाम अमृत सपकाळे रा अमळनेर दरवाजा एरंडोल जि जळगाव याचे वर होता . त्या नंतर राजू गुजरे , घनशाम सपकाळे, व योगेश वाणी यांना अटक करण्यात आली होती . त्या नंतर खुनाचे कलम देखील वाढविण्यात आले होते.
त्या नंतर घनशाम अमृत सपकाळे रा. एरंडोल जि जळगांव यांनी एरंडोल येथील ॲड. आल्हाद माधवराव काळे यांचे मार्फत दि.७/५/२०२५ रोजी भुसावळ येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज क्रमांक २४६/२०२५ दाखल केला व त्या नंतर दि.१३/५/२०२५ रोजी जामीन अर्जावर सुनावणी घेत संशयित आरोपी घनशाम अमृत सपकाळे रा अमळनेर दरवाजा .एरंडोल जि. जळगाव यास मे. न्यायालयाने अटी शर्ती वर जामीन मंजूर केला. सदर जामीन अर्जाचे कामी ॲड.आल्हाद एम काळे,ॲड.अजिंक्य ए काळे यांनी कामकाज पाहिले तर कुणाल कचरे( भुसावळ) यांनी सहकार्य केले.