नाशिक :- ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. वेळप्रसंगी अनेक प्रेमी युगुल कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात जाऊन एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात.काही प्रेमी युगुलांनी तर थेट पळून जाऊनही लग्न केल्याचे अनेक किस्से आहेत. पण सगळेच प्रेमविवाह हे शेवटपर्यंत टिकत नाहीत. कधीकधी सुरुवातीला एकमेकांवर जीवापाड प्रेम असणारे तरुण-तरुणी नवरा बायको झाल्यावर मात्र प्रेम विवाहानंतर सर्वच लग्न शेवटपर्यंत टिकत नाहीत. काही जोडप्यांत क्षुल्लक कारणामुळे भांडण होतात.
असाच एक प्रकर सिन्नर तालुक्यात घडला आहे. प्रेमविवाह झाल्यानंतर माहेरी आलेल्या बायकोचे पतीनेच चक्क अपहरण केले आहे.या अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अगदी सिने स्टाईल झालेल्या अपहरणानंतर मुलगी आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिन्नर तालुक्यातील आहे.कल्याणी दळवी ही 19 वर्षाची तरुणी आहे. तिने दोन महिन्या पूर्वी वैभव पवार या तरुणा बरोबर लग्न केलं होतं. तो सिन्नरच्या पांगरी इथला रहिवाशी आहे. या दोघांचा प्रेम विवाह होता.
20 जानेवारीला या दोघांचा विवाह झाला. त्यानंतर तिला तो मारहाण करायला लागला. त्यामुळे लग्न झाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात 8 मार्चला ती माहेरी निघून आली. पत्नी माहेरी गेली हे वैभवला काही पटलं नाही. त्याला त्याचा प्रचंड संताप झाला. त्यातून त्याने पत्नीचेच अपहरण करण्याचा कट रचला. कल्याणी आपल्या आईसह पांगरी इथं गेली होती. त्यांच्या बरोबर तिचा भाऊ ही होता. त्याच वेळी कल्याणीचा नवरा वैभव आपल्या मित्रांसह कार घेवून तिथं आला. कुणाला काही समजण्या आत त्यांनी कल्याणीवर झडप टाकली. तिला गाडीत कोंबलं. तिला सोडवण्यासाठी आई पुढे सरसावली. पण तिला ही मारहणा करण्यात आली.
भावाला ही मारण्यात आलं. शेवटी कल्याणीला गाडीत टाकून तो तिथून पसार झाला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.बळजबरीने गाडीत टाकल्यानंतर वैभव तिला घेवून संगमनेरला नेले. पुढे बसने तो तिला लोणी इथं पर्यंत घेवून आला. शिर्डीच्या दिशेने पायी जात असताना त्यांच्यावर पोलिसांना संशय आला. त्या दोघांनाही पोलीसांना ताब्यात घेत पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर कल्याणीने आपल्या बरोबर झालेली सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. कल्याणीच्या फिर्यादी वरून पोलिसांनी तीचा पती आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तापस पोलिस उपनिरीक्षक विजय कोठावळे,सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे,अधिक तपास तपास करीत आहेत