एरंडोल :- तालुक्यातील खर्ची येथील शेत शिवारात अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. शरद रामा भिल (वय, ३५) असे या ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.तो शुक्रवारी शेतात कांदे काढायला गेला होता. सायंकाळी वादळासह पाऊस सुरु झाल्याने तो घरी परतत होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि तो जागीच ठार झाला. शरद भिल हा कामतवाडी तालुका धरणगाव येथील रहिवासी होता तो खर्ची येथील जावई होता. दरम्यान एरंडोल शहरापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरील उत्राण रस्त्यावरील एरंडोल शेतशिवारात वीज पडून 2 बकऱ्या मृत्यू झाल्या आहेत अशी माहिती एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे.