जळगाव : –आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये.अश्या शब्दात गिरीश महाजन यांनी अमोल मिटकरी यांचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले कि, अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे,”
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मितकरी यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेत ब्राम्हण समाजाबद्दल चुकीचे विधान केले. यामुळे त्यांच्यावर चहूबाजूनी टीका होत आहे. भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखाली त्यांच्यावर टीका केली.
लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला.
अमोल मिटकरी मानसिक रुग्ण असल्याचे म्हणतं संतप्त झालेल्या आंदोलकांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर मोठा राडा केला. तसेच मिटकरींवर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
याच बरोबर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर महाजन म्हणाले कि, “सत्ताधारी तीनही पक्षांचे तोंड तीन बाजूला आहे. त्यामुळे कोणत्याही विषयी राज्य सरकारचे एकमत होत नाही. आतापर्यंत अशी स्थिती राज्याची कधी नव्हती व इतके वाईट दिवस राज्याला कधी आले नाही..