धरणगाव प्रतिनिधी:-(योगेश पाटील) धरणगाव शहरात अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून श्रीस्वामी समर्थ केंद्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की सालाबादप्रमाणे श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यात माता भगिनी व पुरुष बंधू बहुसंख्येने श्री गुरुचरित्र परायण करण्यास बसलेले असून केंद्रात सर्वप्रथम ग्रामदेवता निमंत्रण देण्यात आले त्यानंतर सेवेकरी बंधूंकडून प्रहरी सेवा ही सप्ताहात अखंडपणे करण्यात येते.
यात सकाळी महिलावर्ग व रात्री पुरुष वर्ग आपली सेवा रुजू करत असतात तसेच गणेश याग, गीताई याग,स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग,चंडी याग व सकाळी नित्य स्वाहाकार होऊन सकाळी भूपाळी आरती त्यानंतर नैवेद्य आरती व सायंकाळी संध्या आरती होत असते.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यानिमित्ताने शहरातील व खेड्यापाड्यातील असंख्य सेवेकरी बंधू-भगिनी याचा लाभ घेऊन स्वामींच्या आशीर्वाद रुपी प्रसाद घरी घेऊन जातात तरी यावर्षी सालाबादाप्रमाणे सर्व कार्यक्रम व सेवा स्वामींच्या कृपेने वेळेवर होणार असून याची नोंद प्रत्येक सेवेकर्यांनी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.