एरंडोल :- येथे दि.१९/४/२०२५ रोजी मध्यरात्री गोवंशाचे कातडे शेख शहजाद शेख नईम राहणार कासोदा तालुका एरंडोल यांचे मालकीचे गोवंशाचे कातडे अंदाजे 500 नग हे मोहम्मद नदीम अब्दुल करीम राणा मालेगाव व मोहम्मद समीर मोहम्मद सादिक शेख राहणार बडा कब्रस्तान मुस्लिम नगर सुलेमान चौक मालेगाव तालुका मालेगाव हे शेहजादशेख नईम याचे सांगणे वरून बेकादेशीर रित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या विना पास परवाना त्याचे ताब्यातील ट्रक क्रमांक MH 19 z 9909 मध्ये भरून वाहतूक करत असताना मिळून आले होते.
त्या नंतर फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक ४७/२०२५ शेहजाद शेख नईम , रा कासोदा यानी २३/४/२०२५ रोजी गोवंशाची कातडी परत मिळणेचा अर्ज दाखल केला त्या वर सुनावणी घेत दिनांक २२/५/२०२५ रोजी मे. एरंडोल न्यायालयाने सदरचा अर्ज नामंजूर केला.सदरील वाहन हे एरंडोल बजरंग दलाच्या गोरक्षकांनी रात्री पकडून पोलीस स्टेशन ला हजर केले होते.