दुकानाचे शटर वाकवून बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह 24 तासात केले जेरबंद.

Spread the love

जळगाव : – शहरातील अजिंठा चौफुली येथील मानस हॉटेल शेजारी चौधरी बैटरी ट्रेडींग नावाचे बॅटरीचे दुकान असून त्यांचा जुन्या बैटरी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. या दुकानातून दुकानाचे लोखंडी शटर वाकवून दुकानातील ४१ हजार रुपये किमतीच्या जुन्या ४१ बॅटऱ्या चोरुन नेल्या होत्या.या आरोपींचा शोध घेऊन अकोला जिल्ह्यातून 6 लाख 31 हजाराच्या मुद्देमालासह 24 तासात एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

सविस्तर वृत्त असे की सुप्रीम कॉलनी येथे राहणारा अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी वय ४७ वर्षे याच्या चौधरी बैटरी ट्रेडींग या दुकानातून १७ मे रोजी 8 वाजता ते १८ मे च्या ०८ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर वाकवून दुकानातील ४१ हजार रुपये किमतीच्या जुन्या ४१ बॅटऱ्या चोरुन नेल्या होत्या या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.वेगाने तपासाची चक्रे फिरवुन, घटनास्थळाचे व आजुबाजुचे सिसिटीव्ही फूटेजची पाहणी केली असता गुन्हा करण्यासाठी आरोपींनी पांढरे रंगाचे बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केलेला दिसून आला.

याबाबत गोपनिय माहीती तसेच तांत्रीक माहीतीचे विश्लेषन करुन गुन्ह्याचे तपासात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथून आरोपी अजमदउल्ला अमानतउल्ला खान वय २४ वर्षे रा. पिंपळगाव राज ता.खामगाव जि. बुलढाणा, सेव्यद दानिश संव्यद ईसमाईल वय २५ वर्षे रा घोडेगाव, ता. तेल्हारा जि. अकोला यांना २० रोजी अटक करण्यात आलेली आहे.आरोपी कडून गुन्द्वातीत चोरीस गेलेल्या ३१ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या व गुन्ह्यात वापरलेले ६ लाख रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आलेले असून एकूण ६ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

२४ तासाचे आत हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे डि बी पथकाचे राहुल तायडे, चंद्रकांत धनके, दत्तात्रय बडगुजर, प्रदीप चौधरी, सिध्देश्वर डापकर, रतन गिते, योगेश चारी यांनी केलेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी