भडगाव महसूल पथकाने जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर अद्याप पर्यंत कारवाई का नाही?

Spread the love

कारवाई न होण्यासाठी तहसीलदारांवर कुणाचा दबाव? भडगाव तहसीलच्या प्रांगणात बनला चर्चेचा विषय

भडगाव | प्रतिनिधी

भडगाव शहरातील कराब शिवारात गिरणा नदी पात्रातून दि.१६/५/२०२५ रोजी मध्यरात्री भडगाव महसूलच्या एका पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करत ते ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालय यांच्या ताब्यात दिले. यावेळी पथकातील तलाठ्यांनी रिपोर्ट बनवला सदर सापडलेल्या ट्रॅक्टर वरील चालकाचा जबाब घेतला व पंचनामा केला परंतु पंचनाम्यात नावात बदल करून ते नाव खोडण्यात आले आहे. तसेच सात दिवस उलटले तरी त्या वाहनावर दंडात्मक कारवाईची नोटीस निघालेली नाही का निघाली नाही अशी खमंग चर्चा भडगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात चर्चिले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की भडगाव गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर,डंपर, जेसीबी,हे जर महसूलच्या पथकाने पकडले तर त्याला काही कालावधीनंतर दंडात्मक नोटीस बजावली जाते परंतु या प्रकरणात सात दिवस उलटले तरी नोटीस का बजावली नाही ? तसेच तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुणाचा दबाव आला का ? दंडात्मक कारवाईची नोटीस न निघाल्यास असा प्रकार पुन्हा पुन्हा घडू शकतो व तो इतरांवर अन्याय होऊ शकतो असे तहसील कार्यालयाच्या आवारात खुल्या चर्चेचा विषय बनला आहे. तरी महसूल विभागाने त्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करून नाशिक विभागात अव्वल आलेल्या भडगाव चे नाव नाव लौकिकच राहू द्यावे असे सुज्ञांकडून बोलले जात आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी