चंद्रपूर :- पेपर देण्यासाठी प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला. पेपर झाल्यानंतर दोघांचीही भेट झाली. दोघेही एकांतात बसले. अचानक लग्नाच्या विषयावरून किरकोळ भांडण झाले. त्यामुळे प्रियकराने प्रयेसीच्या समोरच तिची ओढणी घेऊन झाडाला गळफास लावूण घेण्याची धमकी दिली. ही मज्जाक सुरू असतानाच अचानक ओढणी गळ्याला आवळली आणि प्रियकराला गळफास लागून मृत्यू झाला. ही घटना चिमुरातील भूमि एम्पायरच्या मोकळ्या लेआऊटमध्ये घडली. प्रितम यशवंत वाकडे (वय 25) असे मृतक प्रियकराचे नाव आहे. तो उमरेड तालुक्यातील पिंडकेपार येथील रहिवासी होता. मनाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेने दोन्ही कुटूंबावर शोककळा पसरली आहे.
सोमवारी चिमुर येथे मृतकाच्या प्रेयसीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात एम.ए. चा पेपर होता. पेपर देण्याकरीता ती आली होती. प्रेयसी चिमुरात आल्याची माहिती प्रियकर प्रितमला झाली. लगेच तो उमरेड तालुक्यातील पिंडकेवार गावातून तिला भेटायला चिमुरात आला. पेपर संपताच दोघेही शहरातीलच नेरी मार्गावरील भूमी एम्पायरच्या ले आऊट मध्ये एकांतात वेळ घालविण्यासाठी गेले. दोघेही एकांतात असताना प्रियकर व प्रेयसीमध्ये प्रेमाच्या चर्चा रंगल्या. त्यांच्यात लग्नाच्या संबंधावरूनही चर्चा झाली. काही किरकोळ भांडण झाले.
याच किरकोळ भांडणातून प्रियकर स्वतः गळफास घेऊन जिवन संपवू का म्हणून प्रेयसीची गंमत करीत होता.बसलेल्या ठिकाणी कडू लिंबाचे झाड आहे. त्याच झाडाला प्रियकराने प्रेयसीची ओढणी बांधली आणि आत्महत्या करण्याची मज्जाक करीत होता. अचानकच ओढणीचा फास गळ्याला आवळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा प्रेयसीला धक्काच बसला. प्रियकराची मज्जाक त्याच्या अंगलट आल्याने त्याचा जीव गेला. प्रियसीपने या घटनेची माहिती स्वतःच्या व प्रियकराच्या घरी दिली. प्रियकराच्या मृत्यूची माहिती वाऱ्यासारखी चिमुरात पसरली. प्रेयसीच्या डोळ्या देखत प्रियकराचा मृत्यू झाल्याने तिने लगेच या घटनेची माहिती प्रेयसीने पोलिसांतही दिली. पोलिस निरीक्षक संतोष बाकल, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, सहाय्यक उप पोलिस निरीक्षक विलास निमगडे यांचा ताफा घटनास्थळी पोहचला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. काल बुधवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. मनला चटका लावून गेलेल्या या घटनेमुळे एका प्रियकराचा जिव प्रेयसीच्या डोळ्यादेखत गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.