धक्कादायक! मॅट्रिमोनियल साईटमुळे दोघांची झाली भेट , लग्नाचे आमिष दाखवून 29 वर्षीय शिक्षिकेवर अत्याचार ,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

Spread the love

अकोला :- जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथील 29 वर्षीय एका शिक्षिकेवर आरोपी स्वप्नील भिसे यांनी लग्नाचे स्वप्न दाखवत धोका दिला. आरोपीने प्रेमाचे नाटक करत 28 एप्रिल रोजी आपल्या जालना येथील घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

डिजिटल युगात ऑनलाइन मॅट्रिमोनियल साईट्सवर लग्न जमवणे सामान्य झाले आहे. मात्र, या विश्वासाच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून शिक्षिकेची फसवणूक आणि समाजाच्या नैतिक मूल्यांना धक्का पोहोचवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुर्तीजापूर येथील 29 वर्षीय एका शिक्षिकेवर आरोपी स्वप्नील भिसे यांनी लग्नाचे स्वप्न दाखवत धोका दिला. आरोपीने प्रेमाचे नाटक करत 28 एप्रिल रोजी आपल्या जालना येथील घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर लग्नास संपूर्णपणे नकार दिला. या घटनेने फक्त शिक्षिकेच्या आयुष्याला नव्हे, तर तिच्या सामाजिक प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे.त्यानंतर शिक्षिकेच्या तक्रारीनुसार मुर्तीजापुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करत आहेत. सदर प्रकरणाचा तपास पुढील न्यायालयीन कार्यवाहीसाठी जालना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान या घटनेने समाजातील महिलांनी होणारी फसवणूक आणि शारीरिक शोषण या घटना अधोरेखित होत आहेत. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवावा, तर समाजाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जबाबदारीची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी