नाशिक :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली अशीच एक घटना सप्तशृंगगड येथील शितकड्यावरून उडी घेत युवकासह विवाहितेने जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी (दि. 26) घडली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथील युवक अदित्य संजय देशमुख (२7) व फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ (२4) या दोघांनी शितकड्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह भातोडा शिवारात गडाच्या दक्षिण बाजूस आढळून आले. ही घटना सोमवारी (दि. २६) दुपारी २ ते २.३० च्या सुमारास घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भातोडे येथील पोलिस पाटील विजय राऊत यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले.
दरम्यान, मोनिका शिरसाठ बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी यापूर्वीच वणी पोलिसांत दाखल केली होती. वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूप्रकरणी दोन विविध नोंदी केल्या आहेत. दोघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.