दोघांनी केला प्रेमविवाह, दाम्पत्याला झाली दोन मुले, पतीच्या व्यसनामुळे झाला वाद, पत्नीने विषारी द्रव प्राशन करून संपविले जीवन.

Spread the love

जळगाव :- यावल तालुक्यातील तरुणीचा नशिराबाद येथील रिक्षाचालकासोबत प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले असून, गेल्या तीन दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरू होते. भांडणानंतर पती घरातून निघून गेला.त्यानंतर पत्नीने विषारी द्रव प्राशन केले. गल्लीतील ग्रामस्थांना कळाल्यावर त्यांनी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान या विवाहितेचा मृत्यू ओढवला. सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

नशिराबाद ग्रामस्थांनी जिल्‍हा रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०) या खालची अळी, नशिराबाद येथे पती व दोन मुले अशा कुटुंबीयांसह वास्तव्यास होत्या. दरम्यान, शनिवारी  दुपारी त्यांना जिल्‍हा रुग्णालयात ग्रामस्थांनी दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू ओढवला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सारिका यांचे माहेर यावल तालुक्यातील असून, डिगंबर वाघुळदे यांच्यासोबत ऑक्टोबर २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून घरात कुरबूर सुरू होती. त्यात डिगंबर वाघुळदे यांना दारुचे व्यसन असल्याने वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीच्या भांडणानंतर डिगंबर रिक्षा घेऊन निघून गेला असताना सारिका यांनी विषारी द्रव प्राशन केल्याने त्यांना त्रास जाणवत होता.गल्लीत वेगळे राहत असलेल्या डिगंबरच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सारिका यांना रुग्णालयात आणले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू ओढवला. मृत्यूची माहिती कळाल्यावर पतीने रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी त्याची विचारपूस चौकशी केली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी