भडगांव | प्रतिनिधी :- धुळे येथे दि.२९/०५/२०२५ रोजी कै. सौ. शारदा उर्फ पुजा बागुल (माळी) हिचा अमानुषपणे छळ करून खुन केल्याच्या निषधार्थ व आरोपीस फाशी ची शिक्षा व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी भडगाव तहसील कार्यालयावर आज सकाळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महसूल प्रशासनाला विवीध मागण्यांचे निवेदन कुटुंब व नागरिकांच्या वतीने देण्यात आले. दरम्यान प्रतिनिधीक मनोगत व्यक्त करण्यात आले. यात आरोपीला तत्काळ फाशी द्या, त्यांना जलगाव येथे सबजेल ला रवाना करा आदी मागण्या आक्रमक पने मांडण्यात आल्या.
भडगाव येथील माहेरवाशीण कै. सौ. शारदा उर्फ पुजा बागुल (माळी) हिचा तिच्या सासरच्या लोकांनी अमानुषपणे छळ करून मारहाण करुन व तिच्यावर विष प्रयोग करून तिचा संगनमताने खुन केलेला आहे. तसेच तिचा पती हा भारतीय सैन्य दलात नोकरीस असुन प्रज्ञा कर्डीले नामक महिले सोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या कै. सौ. शारदा उर्फ पुजा बागुल (माळी) हिचा घरातील इतर सदस्य, प्रियसी प्रज्ञा कर्डिले व इतर यांचे सोबत आपसात संगनमत करुन निर्घण पणे खुन केलेला आहे. त्याबाबत पश्चिम देवपुर, धुळे येथील पोलीस स्टेशनला गु.र.नं.१९५/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम १०३ (१), ३(५), ४१. ८५. ११५(२), ३५१(२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
वरील प्रमाणे सत्यपरिस्थीती असतांना कै. सौ. शारदा उर्फ पुजा बागुल (माळी) हिचे मृतआत्म्यास न्याय मिळावा म्हणुन सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच आमच्या सर्व नागरीकांच्या वतीने खालील काही प्रमुख मागण्या करीत आहोत. त्या मागण्यांवर शासनाने न्यायाच्या दृष्टीने सहानुभूतिपुर्वक विचार करून न्याय द्यावा ही विनंती.
१. ही केस धुळे जिल्ह्यातील मे. न्यालयालयात न चालवता ती जळगाव येथे फास्टट्रॅक न्यायालयात वर्ग करण्यात यावी.२) तसेच केसचा तपास हा विशेष बाब म्हणून पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकारी यांचेकडेस वर्ग करण्यात यावा. ३) तसेच सदर केससाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणुन अ) अॅड. श्री. प्रदिप घरट, पनवेल, ब) अॅड. श्री. शिशिर हिरे, मालेगाव, क) अॅड. श्री. राजन साळुंखे, ठाणे या पैकी एका अॅडव्होकेट महोदयांची फास्ट ट्रॅक न्यायालयात व वेळोवेळी अपिलाचे कामी मा.ना.उच्च न्यायालयात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणुन नियुक्ती करण्यात यावी. ४) गुन्ह्यातील मुख्य आरोपी व मयताचा पती कपिल बाळु बागुल याची जंगम व स्थावर मालमत्ता व भविष्यात मिळणारी पेन्शनची रक्कम ही त्याचे व मयताचे दोन्ही अपत्य नामे अ) चार्वी कपिल बागुल, ब) चैतन्य कपिल बागुल यांच्या नावे करण्यात यावी. तसेच ही दोन्ही अपत्ये जो पावेतो सज्ञान होत नाही, तो पावेतो त्यांचे अ.पा.क. पालक म्हणुन मयताचे वडील श्री. शिवाजी राघो महाजन यांचे नाव लावण्यात यावे.
५) तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा भारतीय सैन्य दलात असल्याने व स्थानिक राजकीय लागे बांधे असल्याने या आरोपीस धुळे जेलमध्ये व्ही. आय. पी. व्यवस्था पुरवली जात असुन कोणत्याही मे. न्यायालयाचे आदेश नसतांना त्यास दोन्ही वेळेस घरचे जेवण दिले जात आहे. ६ ) सदर आरोपीची राजकीय हितसंबंध असल्याने व पोलीस दलात वजन असल्याने धुळे येथे जेलमध्ये राहुन सुद्धा आरोपी हा साक्षीदारांवर दबाव आणुन व इतर पुराव्यांमध्ये ढवळा ढवळ करुन मयताचे परिवारास व मयताचे मृत आत्म्यास न्याय मिळु देणार नाही, म्हणुन सदर आरोपीची रवानगी ही अमरावती, नागपुर येथील सब जेलला करण्यात यावी. या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे धनदांडगे असुन राजकीय हितसंबंध असलेले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपाती पणे व सरस निरस मानाने व्हावे म्हणुन आमच्या वरील सर्व मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्यात, हि विनंती..
निवेदनावर असंख्य नागरिकांच्या सह्या असून प्रत महितिस्तव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्ता – नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधिक्षक जळगाव आदींना देण्यात आल्या आहेत.
बाजार दिवस असताना मोर्चा दरम्यान गावात एकच शांतता:- बाझार चौक, मेन रोड मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वळसा घालून तहसील कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भडगाव येथे आज शुक्रवार बाजार दिवस असताना गावात मोर्चा दरम्यान एकच शांतता पसरली होती. सर्व नागरीक, मजुर, शेतकरी, विविध संघटना, राजकीय पक्ष पदाधिकारी, शिक्षक, डॉक्तर, व्यापारी, कामगार, ठेकेदार, युवक, महिला, आदी मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी साहेबराव महाजन, भाजचे अमोल शिंदे, भाजप महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा तथा धुळे येथील माजी महापौर जयश्रीताई अहिरराव , माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पवार, शशिकांत येवले, गणेश परदेशी, सचिन चोरडिया,पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील, एकनाथ महाजन, दिपक महाजन, शिवसेना तालुकप्रमुख सुधकर पाटील, माजी नगरसेविका योजनाताई पाटील, प्राजक्ताताई देशमुख भाजपच्या नूतनताई पाटील, नितीन महाजन, सागर महाजन, युवराज पाटील, मनोहर चौधरी, डॉ प्रमोद पाटील, डॉ नीलेश पाटील, डॉ विलास पाटील, ऍड नीलेश तिवारी, प्रहारचे विजय भोसले , मनसेचे जिल्हाध्यक्ष अनील वाघ, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, सेनेचे लखीचंद पाटील, शिवदास महाजन, महेंद्र ततार, रवी अहिरे , अजय चौधरी, पिनु महाजन, अतुल पाटील, अमोल पाटील, माजी उपसभापती संभाजी भोसले, नीलेश मालपुरे , ठेकेदार संभाजी पाटील, यांच्या सह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
भारताच्या सैन्यात दाखल असलेला सैनिक अशी घटना करतों याची कल्पनाही केली जात नाही. काही लोकांना सुपारी देऊन त्याने असे धाडस केले, या पूर्वी हि गौंडगाव येथील झाली , या घटनेला 2 वर्ष पुर्ण होत आले तरी न्याय नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट काय आहे. शासनाला त्याचा अर्थ तरी कळतो आहे का? म्हणुन आम्हीं स्वतः शासना कडे मागणी करणार आहोत. की अशा घटनेत सहा महिन्याच्या आत निर्णय लागले पहिजे.
यां घटनेत विष देऊन, हात तोडून मोठी मारहाण यां ताईला करुन तिला संपविण्यात आले. या घटनेचा निषेध करत लवकर न्याय मिळावा अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी बोलतांना केली.
यावेळी भाजप महीला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्रीताई अहिरराव यांनी घटनेतील पहिल्या दिवसापासून च्या घडामोडी कथन करत आम्हीं यात पाठपुरावा करत आहोत. कोणत्याही महिलेवर असे अत्याचार सहन केले जाणार नाही. म्हणत घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे येथे मोर्चा काढला जाईल असेही सांगीतले. यावेळी साहेबराव महाजन, वैशालीताई सुर्यवंशी, युवराज पाटील,नितन महाजन, मधुकर महाजन, मयत शारदा ची बहिण नातलग यांनी मनोगत व्यक्त केले.
(धुळे येथे मोर्चा काढणार:- यावेळी कुटुंबाच्या व नागरिकांच्या वतीने बोलताना जाहीर करण्यात आले की प्रशासनाने या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. भडगाव सह धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मोर्चादरम्यान देण्यात आला.)