शिक्षकी पेशेला काळीमा! मुख्याध्यापकाने शाळेतील प्रयोगशाळेला बनवलं बेडरूम! शिक्षिकेसोबतचे अशोभनीय कृत्य CCTV मध्ये कैद.

Spread the love

महुआ (बिहार) :- येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात खळबळजनक घटना घडली. शिक्षकी पेशेला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं विद्यार्थ्यांनाही धक्काच बसला आहे.शाळेतील मुख्याध्यापकाने प्रयोगशाळेतच एक बेडरुम बनवला आहे. या मुख्याध्यापकाचा शिक्षिकेसोबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसच याप्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, माध्यमिक विद्यालय हरपूर मिर्जानगरचे प्रभारी प्राध्यापक हेमंत कुमार यांना निलंबीत करण्यात आलंय. विद्यालयातील एका शिक्षिकेसोबत या मुख्याध्यापकाने अशोभनीय कृत्य केल्यानं ई-शिक्षा पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली होती.

चौकशी दरम्यान सर्व शिक्षकांनी मौन बाळगलं

या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा शिक्षण पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकावर कठोर कारवाई केली. तसच या घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेशही शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला, त्यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

प्रयोगशाळेला बनवलं बेडरूम

विद्यालयातील मुख्याध्यापकाची जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की, प्रयोगशाळेची चावी त्यांच्याकडे नाहीय. प्रयोगशाळेची चावी प्राध्यापकांकडे आहे. जेव्हा प्रयोगशाळेची चावी घेऊन तपास केला गेला, तेव्हा त्यामध्ये एक बेड असल्याचं समोर आलं. या बेडरुममध्ये चुकीचं कृत्य घडत असल्याचंही नंतर उघडकीस आलं.या प्रकरणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शशी रंजन यांनी विद्यालयाची प्रतिमा खराब केल्याबद्दल आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे मुख्याध्यापक हेमंत कुमार यांच्यावर कारवाई केली. कुमार यांचं तातडीनं निलंबन करण्यात आलं. याप्रकरणाचा तपास 45 दिवसात पूर्ण केला जाईल, असं सांगितलं जात आहे. तसच मुख्याध्यापकाविरोधात कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी