झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेवून ये अशी मागणी करून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण व शिवीगाळ करून मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पती,सासू,नणंद,दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी,की शहरातील मुल्लावाडा येथील रहिवासी शाहिस्ता इमरानखान पठान वय-२६(ह.मु.शाहूनगर,नुरानी मस्जिद जवळ,जळगाव) यांचा विवाह २ मार्च २०१४ रोजी इमरानखान लुकमानखान यांच्याशी झाला होता.शाहिस्ता पठाण यांना तीन अपत्य आहेत.विवाहानंतर एक वर्ष शाहिस्ता यांच्याशी पती व सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली.मात्र एक वर्षानंतर सासरच्या लोकांनी लग्नात आमचा मानपान झाला नाही,घरगुती सामान कमी दिला,तुला काम येत नाही असे बोलून तिला मारहाण करून मानसिक त्रास दिला.पती इमरानखान यास मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करून सासरच्या लोकांनी तीच्या चारित्र्यावर संशय घेवून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
शाहिस्ता यांची माहेरची परीस्थिती गरिबीची असल्यामुळे तसेच तीन लहान मुले असल्यामुळे तिने सासरच्या लोकांचा त्रास सहन केला.माहेरून एक लाख रुपये आणले नाही तर तुला ठार मारू,तलाक देऊ अशी धमकी सासरच्या लोकांनी दिली.विवाहितेची आई जैब्बूंनीसाबी ह्या जळगाव येथे गेल्या असता सासरच्या लीकानी शाहिस्तेसह तीच्या आईस देखील शिवीगाळ करून मारहाण केली.तसेच पती इमरानखान पठान यांनी तीन वेळा तोंडी तलाक दिला.याबाबत शाहिस्ता इमरानखान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती इमरानखान पठान,सासू बानोबी लुकमानखान,नणंद शबाना आरिफ खान,शमीम रईस खान,दीर शाहरुख लुकमान खान सर्व राहणार शाहूनगर,जळगाव आणि रुबिना इमरानखान रा.शिवणा,ता.सिल्लोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील,सुनील लोहार तपास करीत आहेत.