एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपातच, पत्नीचा संशय ठरला खरा; स्थानिक गुन्हे शाखेने केली तीन संशयितांना अटक.

Spread the love

एरंडोल :- माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा पघात नसून जुन्या वादाच्या कारणावरून त्यांची हत्या करण्याच्या प्रयत्न करणा-या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तीनही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश श्रीमती बी.ए.तळेकर यांनी दिला.माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांना अपघाताच्या माध्यमातून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून ठिकठीकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी,की माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन हे १२ जून रोजी भालगाव येथे पोल्ट्री फार्मच्या बांधकामासाठी लागणा-या मुरुमाची पाहणी करण्यासाठी गेले होत.भालगाव येथून घराकडे येत असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका कल्पना महाजन यांनी पती दशरथ महाजन यांचा अपघात झाला नसून घातपात करण्यात आल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती.दशरथ महाजन यांचा अपघात होऊन सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी उलटून देखील अपघात की घातपात याचा तपास लागत नसल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु होती.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी अपघाताचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांनी अपघाताच्या चौकशीसाठी दोन पथकांची नियुक्ती केली होती. पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरु केला होता.अपघाताच्या पहिल्या दिवशी ११ जून रोजी तालुक्यात वादळी वा-यासह पाउस झाल्यामुळे बहुतेक भागातील वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे गावातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे तपास करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासमोर उभे होते. पथकातील हवालदार प्रवीण मांडोळे व राहुल कोळी यांनी एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही सुमारे आठ तास पाहणी केली.त्यामध्ये गुन्ह्यातील तीन साशायीतांची ओळख पटवून माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपात असल्याचे उघड केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमेश उर्फ बदक सुरेश सुतार, शुभम कैलास महाजन व पवन कैलास महाजन या तीन संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त केले आहे. संशयित उमेश सुतार याने गुन्ह्याची कबुली दिली असून जुन्या वादातून मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीप पाटील,पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड,उपनिरीक्षक शरद बागल,हवालदार सोपान गोरे,हिरालाल पाटील, संदीप पाटील,प्रवीण मांडोळे,अक्रम शेख,प्रवीण भालेराव, रवी कापडणे,राहुल कोळी,जितेंद्र पाटील,भूषण पाटील,प्रशांत पाटील यांचेसह एरंडोल येथील पोलीस कर्मचा-यांनी प्रयत्न केले.दरम्यान माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या पत्नीने केलेला घातपाताच संशय खरा ठरला आहे.माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचेवर मुंबई येथे उपचार सुरु आहेत.शहरात तणावपूर्ण शांतता असून माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या निवासस्थानासह संशयितांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी