धरणगाव | प्रतिनिधी :- येथील श्रीराम मंदिरासमोरील घरात मुलीकडे आलेल्या लिलाबाई विसपुते व 73 राहणार जळगाव यांच्यावर नातवाने चालल्या केल्याचे पाप निदर्शनास आल्यानंतर आज संध्याकाळी आरोपी तेजस पोतदार ला धरणगाव कोर्टात हजर करण्यात आले होते.
यासंदर्भात अधिक माहिती असे की, गुरुवारी 26 जून रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास धरणगाव येथील श्रीराम मंदिरासमोरील घरात मुलीकडे काही दिवस राहण्यासाठी आलेल्या लिलाबाई विसपुते यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती त्यांच्यावर कुराडीने वार करण्यात आले होते वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात देशात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या त्यांना लागलेच धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने लागली जळगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वृद्ध महिलेवर कोणीतरी अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याचे जखमी वृद्ध महिलेच्या नातवाने सांगितल्याचा बनाव केला होता.
या प्रकरणाची उकल काढण्यात धरणगाव पोलिसांना यश आले आहे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब घोलप आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सुमारे दोन तास चौकशी केली लिलाबाई विसपुते या धरणगाव येथे त्यांची मुलगी वैशाली पोद्दार यांच्याकडे काही दिवस राहण्यासाठी आल्या होत्या दिनांक 26 रोजी सकाळी त्यांचा लहान नातू तेजस विलास पोद्दार यांच्याशी वाद झाला
लिलाबाई यांनी तेजसला सांगितले की शेअर मार्केट साठी तू लोकांकडून पैसे घेतो हे योग्य नाही यावरून वाद झाला त्यानंतर दुपारी दोन वाजता तेजस हातात घेऊन खोलीकडे जात असल्याचे मोठा भाऊ अक्षय याने पाहिले होते त्यावेळी हे कुऱ्हाड झाड तोडण्यासाठी आणल्याचे तेजसने सांगितले मात्र दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास तेजसनेस अक्षय ला आजीवर हल्ला झाल्याची माहिती दिली सकाळी झालेल्या वादातून हा प्रकार घडला त्यामुळे लिलाबाई रघुनाथ विसपुते यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तेजस विलास पोतदार यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी उमेद देवेंद्र विसपुते राहणार महाबळ कॉलनी जळगाव यांनी फिर्याद दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत असताना आरोपी तेजस पोद्दारला शनिवारी संध्याकाळी कोर्टात हजर करणार असल्याचे सांगितले.