दुर्दैवी घटना! जळगाव जिल्ह्यात कृषी दिनाच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा.

Spread the love

जळगाव :- जिल्ह्यात कृषी दिनाच्या दिवशीच 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात वर्षभरात 250 तर 6 महिन्यातच 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात तीन राज्यमंत्री आणि एक केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाही आहेत. कृषी दिनाच्या दिवशीच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि चोपडा येथील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

चोपडा तालुक्यातील बोरखेडा गावातील विनोद पाटील हे एक शेतकरी होते. मात्र कर्जाच्या ओझ्यातून विनोद पाटील यांनी आपली जीवनयात्रा संपवली, त्याचबरोबर पाचोरा तालुक्यातील भोजेगाव येथील शेतकरी कुटुंबातील जीवन गोसावी यांनीदेखील आत्महत्या केली आहे.

इतकंच नाही तर राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसंच जळगाव जिल्ह्यात मागील सहा महिन्यात 90 शेतकऱ्यांनी तर वर्षभरात तब्बल 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीवरून पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संदर्भात कुणी आवाज उठवणार का हे बघणार औचित्याचं ठरणार आहे. जळगावसारख्या एका जिल्ह्यात चार चार मंत्री असून देखील शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ का येते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी