पाचोरा गोळीबार हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी जामनेर पोलीस ठाण्यात शरण

Spread the love

जामनेर(प्रतिनिधी):- पाचोरा बस स्थानक परिसरात तरुणावर गोळीबार करत त्याची हत्या केलेल्या दोन्ही आरोपी घटना स्थळा वरून पळ काढत.घटनेच्या काही तासानंतर रात्री जामनेर पोलीस ठाण्यात शरण आले.यावेळी आरोपीनी दोन गावठी पिस्तूल जमा केले. जुन्या वादातून त्यांनी हे हत्या केल्याचे सांगितले. या घटनेतील मयत आकाश कैलास मोरे (वय२७) आरोपी निलेश अनिल सोनवणे,व दुसरा अल्पवयीन आरोपी यांच्यात जुने वाद होते.त्या वादाचे रूपांतर टोकाला पोहचून पाचोरा बस स्थानक परिसरात संबंधित आरोपीनी आकाश मोरे या तरुणावर गावठी पिस्तूलातून १२ गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली. यात आकाशाचा मृत्यू झाला.दरम्यान घटनेनंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून जामनेर पोलीस ठाण्यात शरण आल्याची माहिती जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिली.

मुख्य संपादक संजय चौधरी