एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.

Spread the love


एरंडोल | प्रतिनिधी :- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी तालुका भाजपा तर्फे निवेदन नगर पालिकेस निवेदन देण्यात आले.
निवेदनात शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या खुप झाली असून यामुळे शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत दहशत पसरली असल्याचे म्हटले आहे. दि ४ जुलै रोजी शहरातील दगडूशेठ देवरे यांच्या दुकानावरील सुरक्षा रक्षक कैलास मराठे याला व कोर्टा जवळील माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांच्या कार्यालयाजवळ एका व्यक्तीवर पिसाळलेल्या कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला.त्याचा हल्ला इतका जबरदस्त होता की त्या कुत्र्याला लाठ्याकाठ्यांनी मारुन टाकावे लागले असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान अशा जीवघेण्या घटना वाढण्याआधी सदर कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष योगेश महाजन,निलेश परदेशी,अमरजितसिंग पाटील, ॲड.आकाश महाजन,ॲड.मधुकर देशमुख,भगवान मराठे,आनंद सुर्यवंशी,प्रमोद महाजन,प्रकाश महाले,दिलीप पांडे, मयुर ठाकुर,निखिल सूर्यवंशी,नितीन महाजन आदींची उपस्थिती होती.

नितीन पाटील यांनी दिले निवेदन

एरंडोल शहरात भटक्या कुत्र्यांमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.नगर पालिका प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही बऱ्याच वेळेस प्रत्यक्ष भेट घेऊन तोंडी तसेच लेखी तक्रारी करून देखील नगर पालिका प्रशासनाकडुन आजपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही या भटक्या कुत्र्यांमुळे शाळा,कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जेष्ठ नागरिकांना रस्त्याने येणे जाणे जिकिरीचे झाले आहे शहराच्या प्रत्येक गल्ली बोळात तसेच शहराच्या वार्डात भटक्या तसेच मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे या गंभीर प्रकरणी नगर पालिका प्रशासनास कारवाई करण्यासंदर्भात तोंडी तसेच लेखी तक्रारी केलेल्या आहेत नगर पालिका मोकाट भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यास अद्याप तयार नाही या मोकाट तसेच भटक्या कुत्र्यांमुळे जेष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना एखाद्या कुत्र्यांनी हल्ला चढवला तर त्याची सर्वस्वी जबाबदार एरंडोल नगर परिषद प्रशासनाची राहील एरंडोल शहरातील कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवुन चावा घेतला आणि दुखापत केल्यास त्या रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी म.मुख्याधिकारी सो.नगर एरंडोल यांची राहील!

आपला तक्रारदार श्री.नितीन दशरथ पाटील

मुख्य संपादक संजय चौधरी