एरंडोल :- येथील चौधरीवाडा परिसरातील कुंभारटेक येथील अडोतीस वर्षीय वैफल्यग्रस्त युवकाने काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याबाबत माहिती अशी,की चौधरीवाडा परिसरातील रहिवासी रुपेश रामदास पाटील (वय-३८) या विवाहित युवकाने काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली.रुपेश पाटील हा हॉटेलवर
कामगार म्हणून काम करत होता तसेच त्यास दारूचे व्यसन होते.तीन ते चार महिन्यांपासून तो कोणताही कामधंदा करत नव्हता त्यामुळे तो कायम तणावात राहत होता.काल रात्री त्याची आई बाहेर गेली होती,त्याचवेळेस रूपेशने गळफास घेतला.रुपेशची आई घरी आली असता त्यांना रूपेशने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरोळ्या मारल्या.घराजवळच राहत असलेले रुपेशचे काका भिका
पाटील यांचेसह गोपाल महाजन,धनंजय पाटील यांनी त्यास खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मयत रुपेश याचे पच्छात वृद्ध आई व एक लहान मुलगी आहे.याबाबत भिका पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसस्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार बापू पाटील तपास करीत आहेत.