पारोळा:– शहरातील सूर्यवंशी बारी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभाचे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारोळा सूर्यवंशी बारी समाज मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्येची देवता आई सरस्वती व सुर्यवंशी बारी समाजाचे आराध्य दैवत श्री संत रूपला महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पुजन व वंदन करत या सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. यासमयी इयत्ता १० वी, १२ वी सह अन्य परिक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पारोळा शिवसेनेचे शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, जळगांवच्या नागवेल प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.नितीन उत्तमराव बारी सर, सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी, मा.नगरसेवक सुरेश बारी, हिरो शोरूमचे संचालक अमोल चौधरी यांचेसह सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, आदी मान्यवर, गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक व समाजबांधव उपस्थित होते.
पारोळा तालुका शैक्षणिक गुणवत्तेत अग्रभागी असून यासाठी शिक्षक करत असलेले प्रयत्न महत्वपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कष्टास पालक, समाजाचाही पाठींबा मिळतो, हे अनेक उदाहरणातून दिसते. यामुळेच तालुक्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास गेले आहेत. विद्यार्थी गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळते. सूर्यवंशी बारी समाज हा मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या ४० हून अधिक वर्षाचा राजकारणात सोबत उभा होता, गेल्या वेळीच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या समाजाने अपार प्रेमाचा वर्षाव केला. आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या समाजाने माझा गौरव केला, यातून मला आपल्यासाठी व मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी ऊर्जा प्राप्त झाली.
आज या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार झाला, त्यांना देखील असेच दैदिप्यमान यश यापुढे संपादित करावे अशा शुभेच्छा मी याठिकाणी देतो. सूर्यवंशी बारी समाज हा शहरातील धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतो. या समाजाला आपल्या समाजकारणाचा, राजकारणाचा माध्यमाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे हि मा.आबासाहेब व माझी प्रामाणिक इच्छा होती. आपण ज्या जागेवर आज हा कार्यक्रम घेत आहोत, याठिकाणी सभागृहासाठी अनेकदा मागणी झाली, परंतु काही प्रशासकीय तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते होवू शकले नाही. परंतु धरणगांव रोड लगत आपल्या समाजाला हक्काचे व्यासपीठ म्हणून सामाजिक सभागृहाचे काम मंजूर केले व ते आज पूर्णत्वास आले आहे.
त्याचा देखील लोकार्पण सोहळा येत्या २ ते ३ दिवसांत आपण पूर्ण करणार आहोत. या सुंदर आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असलेल्या कार्यक्रमाला संयोजकांनी उपस्थित राहण्याचा योग जुळवून आणला त्यांचे मी आभार मानतो. गुणवंत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा प्रदान करतो, तसेच येत्या काळात आपल्या समाजाने मागणी केलेल्या काही उर्वरित कामांना देखील पूर्ण करण्याचा माझा निर्धार असल्याचे आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.