झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-इस्लामपूर येथील जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चालीरीती व परंपरा याबाबत अपशब्द वापरून टिंगल टवाळी करणा-या आमदार अमोल मिटकरी यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ब्राम्हण समाजातर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण याना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा जाहीर निषेध केला.
ब्राम्हण समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,की इस्लामपूर येथील जाहीर कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू समाजाच्या विविध परंपराबाबत टिंगल टवाळी कर्ण हिंदू समाजातील नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच पौरोहित्य करणा-या ब्राम्हण समाजाबाबत अपशब्द वापरून समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे.विवाह परंपरेबाबत कोणतेही ज्ञान नसतांना चुकीचे विधान करून समाजाची खिल्ली उडवली आहे.आमदार मिटकरी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे जातीयतेढ निर्माण करणारे असून त्यांनी ब्राम्हण समाजाची व हिंदूंची माफी मागावी.तसेच पक्षश्रेष्ठींनी त्यांनी केलेल्या अपमानास्पद विधानाची दखल घेवून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान शहरातील विविध पक्षाच्या पदाधिका-यांनी आमदार अमोल मिटकरी यांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून निषेध केला असून त्यामध्ये सत्तारूढ महाविकास आघाडीच्या एका राजकीय पक्षाच्या तालुकाध्यक्षांचाही समावेश आहे.ब्राम्हण समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढून आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध केला.तहसीलदार सुचिता चव्हाण याना ब्राम्हण समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित ब्राम्हण समाजाच्या प्रतिनिधींनी ब्राम्हण समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले.
यावेळी शनी महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष परेश पाठक,भूषण जोशी,गोविंद कुलकर्णी,शिल्पा पाठक,अर्चना विंचूरकर,चैताली जोशी,रवींद्र कुलकर्णी,जयश्री कुलकर्णी,निशा विंचूरकर,सरला विंचूरकर,पद्माकर विंचूरकर,चंद्रकांत जोशी,तुषार वडगावकर,संजय अग्निहोत्री,मंदार वडगावकर,देविदास जोशी,अंजली बिडवईकर,अजय जोशी,प्रसाद दंडवते,पुरुषोत्तम कुलकर्णी,राजू भागवत,रश्मी दंडवते,शिरीष विंचूरकर,गायत्री कुलकर्णी,हितेश जोशी,हेमंत कुलकर्णी,दुर्गेश पाठक यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.पौरोहित्य करणारे समाज बांधव पारंपारिक वेशभूषेत मोर्चात सहभागी झाले होते.