उत्राण वि.का.सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदी निवड झालेल्यांचा आमदार अमोलदादा पाटील यांनी केला सत्कार….

Spread the love

एरंडोल :- उत्राण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंकज प्रकाश महाजन आणि व्हा.चेअरमनपदी सौ.सुमनताई गोविंदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. ही निवड निवडणुक निर्णय अधिकारी पी.जे.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. निवडणूक कामी सचिव मधुकर पाटील आणि लिपिक राजु गुरव यांनी काम पाहिले. या निवडीनंतर आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पं.स.मा.सभापती अनिलभाऊ महाजन, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, खेडी येथील पन्नाभाऊ सोनवणे, एरंडोल शेतकी संघाचे सदस्य सौ.सुमनताई पाटील, उत्राण येथील बाळुआण्णा धनगर, गुरुदास चौधरी, पांडुरंग जाधव, रघुनाथ कुंभार, विलास महाजन, ईश्वर धनगर, विजय महाजन, ज्योती महाजन, संजय महाजन, ज्ञानेश्वर पाटील, भारत देवरे, महादु कोळी, धनराज पाटील, हारूण देशमुख, अंतुर्ली सरपंच गौरव पाटील, ताडे सरपंंच सचिन पाटील, निपाणे ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकुर यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध कार्यकारी सोसायटी ही शेतकऱ्यांना विविध सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी महत्वपुर्ण भुमिका बजावते. यामुळे या निवडी नंतर आपल्यावर दोघांवर मोठी जबाबदारी असुन शेतकरी हितासाठी व सहकार्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे या विकासोचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालकांना आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी आश्वासित केले.

मुख्य संपादक संजय चौधरी