राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २४ जुलैला रास्ता रोको आंदोलन

Spread the love

जामनेर (प्रतिनीधी):- राज्यातील शेतकरी वर्गा विषयी उदासीन असणाऱ्या नाकर्त्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी नामदार गिरीश महाजन यांच्या होम पिचवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या वतीने २४जुलै गुरुवार रोजी दुपारी १२ वाजता एल्गार पुकारला जाणार असून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे तालुक्याचे नेते दिलीप खोडपे सर यांनी पत्रकार परिषदेत दिली या वेळी तालुका अध्यक्ष किशोर पाटील,प्रल्हाद बोरसे, अर्जुन पाटील उपस्थीत होते.भुसावळ रोड वरील पक्ष कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यां विषयी महायुती सरकार उदासीन असून कृषिमंत्री बेताल वक्तव्य करतात तर विधानसभेत त्यांचा बराच वेळ रमी खेळण्यात जात आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, रासायनिक खतांच्या किमती कमी करण्यात याव्यां, युरिया व इतर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे, पिक विमा मोफत मिळावा,स्मार्ट मीटरची सक्ती मागे घ्यावी,मे महिन्यात पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी याच बरोबर जामनेर शहरातील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा मिळावी तालुक्यात व बोकाळलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे. आदी मुद्दे घेऊन आमचा रास्ता रोको राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले तरी या जनहिताच्या मागण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनात समविचारी पक्ष व संघटना यांनी हि पाठिंबा दर्शविला असल्याचे त्यांनी सांगीतले

प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट करा सर्व सत्य बाहेर येऊन खर काय हे राज्यासमोर येईल :- दिलीप खोडपे सर

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी हनी ट्रॅप व प्रफुल्ल लोढा यांचा विषय छेडला त्यांनी सांगीतले की आमचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी वारंवार या विषयावर मिडिया समोर आपले मत मांडले असून बराच विषय त्यांनी स्पष्ट केला आहे. प्रफुल्ल लोढा हा कोण असून किती वर्षापासून मधला दोन-तीन वर्षाचा कालखंड सोडला तर तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे तालुक्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. गंभीर स्वरूपाचे आरोप प्रफुल्ल लोढा यांनी केल्यावर ही त्याचे मधुर संबंध कोणाशी होते हे सर्वांना माहीत असून सरकारने प्रफुल्ल लोढा याची इन कॅमेरा नार्को टेस्ट करावी म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळेल व सत्य काय आहे असेल ते समोर येईल ते सत्य इतकं भयानक असेल की त्याची कल्पना ही कुणी केली नसेल

मुख्य संपादक संजय चौधरी