राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करू – माजी मंत्री डाँ.सतीश पाटील; एरंडोल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विविध कार्यक्रम संपन्न.

Spread the love

एरंडोल (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार यांचा यांच्यावर विश्वास ठेवून आपण यांचे हात बळकट करू असे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी वाढदिवस जनविश्वास सप्ताह म्हणून मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रम कार्यालय उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून तालुकाभर साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, सभासद नोंदणी
माध्यमिक व जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. जळगांव जिल्ह्याचे मा.पालकमंत्री मा.मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते भागवत पाटील यांच्या माध्यमातून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.. यावेळी बोलताना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले, की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी राबवलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. राज्यात उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची आपण हात बळकट करून एक मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस उभी करू.भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका साठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा अध्यक्ष संजय पवार म्हणाले जिल्ह्यात डॉक्टर सतीश पाटील मुळे एक मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. यावेळी सदर पक्ष कार्यालय उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले
राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभाक्षेत्र प्रमुख डॉ.शांताराम पाटील
जिल्हासरचिटणीस प्रा हरिष पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन शहर अध्यक्ष ईश्वर बिराडे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष भागवत पाटील तर आभार तालुका युवक अध्यक्ष विजय पाटील यांनी मानले
सदर कार्यक्रमांना पारोळा मार्केट कमिटी संचालक.निंबा पाटील, सुनील रामोशी, सुरेश वंजारी, माजी शहराध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगरसेवक शकूर मोमीन, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष डाँ. वाय डी पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर बडगुजर, मा.युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ ,कासोदा शहराध्यक्ष अजिज बारी,ओबीसी सेल अध्यक्ष विकास साळुंखे ,तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,
नांदखुर्दे सरपंच जगदिश पाटील, महेंद्र पाटील ,अनिल पाटील
,विकास पाटील, दिपक पाटील, विलास पाटील एन.डी.पाटील, विक्की पाटील, ललित सोनवणे, राजु पाटील, सागर बियाणी उत्राण चे जितू महाले. रावसाहेब पाटील, सुभाष पाटील भातखेडे
विजय पाटील, प्रमोद पाटील छोटु पाटील, स्वप्निल पाटील तसेच
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी