झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- येथील जहांगिरपुरा परिसरातील गणपती मंदिराजवळील 34 वर्षी विवाहितेने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पंख्यास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जहांगिरपुरा भागातील गणपती मंदिराजवळ विवाहिता सौ रुपाली विश्वनाथ पाटील वय 34 वर्षे यांनी आज दुपारी घरी कोणी नसताना घरच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पंचायत पंख्यास साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली विवाहितेचे चुलत सासरे दत्तात्रय वामन पाटील यांनी विवाहितेचा पती विश्वनाथ सदाशिव पाटील यांना फोन करून घरी येण्यास सांगितले विश्वनाथ पाटील हे घरी आले असता त्यांना घराजवळ नागरिकांची गर्दी दिसून आली त्यांना नागरिकांनी तुझ्या पत्नीने गळफास घेतल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी सदानंद दत्तात्रय पाटील, सुभाष माधव पाटील, प्रमोद राजेंद्र महाजन यांच्या मदतीने रुपाली पाटील यांना खाली उतरून ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.
डॉक्टर मुकेश चौधरी यांनी मयताचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत सदानंद विश्वनाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील पुढील तपास करीत आहे. मयत विवाहितेचे पती सदानंद पाटील ॲपे रिक्षा चालवून परिवाराच्या उदार निर्वाह करीत होते तर मयत विवाहिता घरीच शिवणकाम करीत होत्या मयत रूपाली पाटील यांचे पश्चात पती, नऊ वर्षाचा मुलगा व चार वर्षे वयाची मुलगी आहे
लिहून ठेवलेली चिठ्ठीतील मजकूर असा
विवाहिता रूपाली पाटील हिने वहीमध्ये लिहून ठेवलेले मिळाले यामध्ये लिहिले आहे की माझ्या मृत्यूबद्दल घरच्यांना दोषी ठरू नये माझी अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी सहन करू शकले नाही. माझ्या आई-वडिलांना माझ्या दंडवत, माझ्या बहिणीस अखेरचा निरोप माझ्या पर्समधील कमळ माझ्या मुला-मुलींची असून त्यांचा सांभाळ करून घ्यावा ही अखेरची विनंती आयुष्यात मुला-मुलींसाठी खूप काही करण्याची इच्छा होती. हरले मी शेवटी…..
पोलिसांसमोर मोठे आव्हान
विवाहिता रुपाली पाटील हिने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अज्ञात व्यक्ती बदनामी करतो असा उल्लेख केल्यामुळे हा अज्ञात व्यक्ती कोण? याला शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
या अज्ञात व्यक्तीमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले लहान मुला-मुलींची आई त्यांच्या तून निघून गेली
पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीस अटक करून त्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.