राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा/जिजाऊ चौकात रस्ता रोको

Spread the love

जामनेर(प्रतिनीधी):- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला शेतकरी वर्गाने चांगला प्रतिसाद देत शेतकऱ्यांचा एल्गार पहायला मिळाला या वेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून नगर परिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकामध्ये रस्ता रोको करून सरकारचा अंत्यविधी केला. राष्ट्रवादीचे डी.के.पाटिल,दिलीप खोडपे यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या वतीने,प्रहार संघटनेचे शेतकरी नेते यांनी पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनाला पाठिंबा म्हणून जामनेरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती

यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हा मुद्दा प्रामुख्याने घेण्यात आला. महाराणा प्रताप चौक पाचोरा रोड येथुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मोर्चा मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे, सक्तीची कर्जवसुली बंद करा, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जुगारातील पत्ते लावलेले अश्या प्रकारची फलक कार्यकर्त्यांच्या हातात होती तर प्रमुख पदाधिकारी यांनी पत्त्याच्या माळा गळ्यात लटकवलेल्या होत्या. सरकारचा निषेध व्यक्त करीत मोर्चा नगर परिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकामध्ये आल्यावर या ठिकाणीं कार्यकर्त्यांनी जुगाराचा डाव मांडीत कोकाटेंचा निषेध नोंदवला

तालुका अध्यक्ष किशोर पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष विश्वजीत पाटील, विनोद पाटिल,रोहन राठोड, दिलीप श्रीपत पाटिल,जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील,ॲड.ज्ञानेश्वर राऊत, दिलीप खोडपे आदींनी सरकार वर सडकून टिका केली तर आज शेतकरी मेताकुटीला आला असताना सरकार व स्थानिक मंत्री महोदय हनीट्रॅप मुळे चर्चेत असून त्यातून त्यांना जनतेच्या कामासाठी वेळच मिळत नाही अशी स्थिती असून मंत्र्यांनी पोसलेला प्रफुल्ल लोढा याची इन कॅमेरा नार्को टेस्ट झाली तर सर्व समोर येईल असे त्यांनी सांगितले. नामदार महाजन यांनी कापसासाठी जे आंदोलनं केल होत त्याची हि आठवण करून देऊन कापसाला मिळत नसलेल्या भावामुळे आज जामनेर मतदार संघात कापसाचा पेरा कमी होऊन मक्याचा पेरा वाढला आहे असे ही सांगितले.

यावेळी भगवान पाटील,भास्कर पाटील,गजानन खराटे,अर्जुन पाटील, प्रल्हाद बोरसे,परमेश्वर पाटील,सागर कुमावत,दिनेश पाटील शहराध्यक्ष सचिन बोरसे,रुपेश पाटील,राजू पाटील,प्रवीण कुंभार संतोष झाल्टे,पवन महाजन,राहुल खोडपे,किशोर खोडपे,अनिस पैलवान,शेख जलील,सुनील काळभिले,सचिन पांढरे,महेश पांढरे उपस्थीत होते.

मुख्य संपादक संजय चौधरी