धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव : येथील ग्रामदैवत श्री मरीआई यात्रेनिमित्त श्रावण महिन्याच्या दर मंगळवारी श्री. व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून नामांकित ईनामी भव्य खुल्या कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे ह्यावर्षीही श्रावण महिन्याचा पहिला मंगळवार दि. २९ जुलै, ५ ऑगस्ट, १२ऑगस्ट, १९ ऑगस्ट, ह्या चार मंगळवारी मरीआई मंदिर परिसरात खुल्या कुस्तीचे सामने होणार आहेत. कुस्तीचा आखाडा श्रावण महिन्याचा प्रत्येक मंगळवारी दुपार ३ वाजेपासून ते सायं. ७ वाजेपावेतो असणार आहे. कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यासाठी जिल्हा, राज्यातील व देशभरातील नामवंत मल्ल (पहिलवान) आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत व अनेक काटा कुस्तीचा थरार पहायला मिळणार आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेला नामांकित भव्य खुल्या कुस्तींचा इनामी सामना पाहण्यासाठी व मल्ल कला व मल्ल कलेच्या विकास जोपासण्यासाठी जास्तीत जास्त मल्लांनी व प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे (पहिलवान) व संचालकांनी केले आहे.