देशभरातील अदिवासी समाजातील प्रमुखांची नवी दिल्ली येथे बैठक; अदिवासी समाजाच्या योजनांबाबत चर्चा.

Spread the love

एरंडोल :- देशभरातील अदिवासी समाजाचे प्रमुख पदाधिकारी व अदिवासी समाजासाठी काम करणा-या प्रमुख पदाधिका-यांची बैठक नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आली होती.बैठकीस देशभरातून ४३ पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून
अँड.किशोर काळकर,गडचिरोली येथील अदिवासी नेते प्रकाश गेडाम,मेळघाट येथील माजी महसूल आयुक्त रमेश मावस्कर हे तीन पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.नवी दिल्ली येथे केंद्रीय अदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने अदिवासी समाजासाठी केंद्राच्या असलेल्या योजना व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी
यावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय अदिवासी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस केंद्रीय अदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम, राज्यमंत्री दुर्गादास उईके,केंद्रीय अदिवासी विभागाचे सचिव राजेश गुप्ता यांचेसह देशभरातील अदिवासी समाजाचे तसेच समाजासाठी कार्य करणा-या प्रमुख पदाधिकारी तसेच निवृत्त आय.ए.एस.व
आय.पी.एस.अधिकारी सहभागी झाले होते.बैठकीत दोन तास अदिवासी समाजासाठी केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या योजना,अदिवासी समाजासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करतांना येणा-या अडचणी,अदिवासी समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत अदिवासी समाजातील आरोग्याची समस्या,शिक्षणाबाबत येणा-या अडचणी,शिक्षणाबाबत समाजात जनजागृती, अदिवासी गावातील तसेच वस्त्यांमधील समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत योग्य धोरण राबवून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून आदिवासींना मूळ प्रवाहात आणून त्यांचा विकास करणे याबाबत नियोजन करण्यात आले.अदिवासी समाजासाठी केंद्र सरकारच्या अदिवासी समाजासाठी असलेल्या योजनांच्या लाभापासून लाभार्थी वंचित राहत असून देशभरातील जनजातीय क्षेत्राच्या प्रमुखांनी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोणतीही अडचण आल्यास केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधावा अशी सुचना अदिवासी विकासमंत्री ज्युएल ओराम यांनी केल्याचे अँड,किशोर काळकर यांनी सांगितले.‌ बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिका-यांनी अदिवासी समाजाच्या विकासाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पदाधिका-यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

मुख्य संपादक संजय चौधरी