एरंडोल :- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात बचतगटांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन आमदार अमोलदादा पाटील यांनी केले.विखरण (ता.एरंडोल) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवानोंन्नती अभियान व पंचायत समितीच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विखरण-रिंगणगाव गटातील प्रांजल महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळाव्यात ते बोलत होते.आमदार अमोल पाटील,श्रीमती मृणाल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी आमदार अमोल पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात उमेद अभियानाची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले.बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असल्याचे सांगितले.ग्रामीण भागाच्या विकासात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.उमेद अभियान हे राज्यातील लाखो महिलांचे हक्काचे व्यासपीठ असून महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या स्वावलंबी बनल्या असल्याचा विश्वास व्यक्त केला.बचतगट महिलांच्या सबलीकरण व सशक्तीकरणाची एक चळवळ बनली आहे.
श्रीमती मृणाल पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.बचतगटाच्या
माध्यमातून गावातच व्यवसाय सुरु करता येत असल्यामुळे महिलांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध होत असल्याचे सांगितले.महिला मेळाव्यास महिलांची लक्षणीय उपस्थिती बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी प्रांजळ महिला प्रभाग संचाच्या पदाधिका-यांनी आमदार अमोल पाटील,श्रीमती मृणाल पाटील
यांचेसह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमास शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुका संघटक संभाजी देसले, युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,देविदास चौधरी यांचेसह
विखरण-रिंगणगाव गटातील प्रभाग संघाचे पदाधिकारी,बचत गटाच्या पदाधिकारी,तालुका अभियान कक्षाचे अधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.मेळाव्यास उपस्थित महिलांनी आमदार अमोल पाटील,श्रीमती मृणाल पाटील यांचेशी मुक्तपणे संवाद साधून चर्चा केली.बचत गटामार्फत सुरु असलेल्या विविध व्यवसायांची माहिती त्यांनी जाणून घेतली.यावेळी बचत गटांना कर्जाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.